विसोऱ्याजवळ भीषण अपघात, टिप्पर नदीत कोसळला




 विसोऱ्याजवळ भीषण अपघात, टिप्पर नदीत कोसळला



गडचिरोली: जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर-विसोरा मार्गावरील गाढवी नदीच्या पुलावर भरधाव वेगातील टिप्पर व ट्रॅक्टरची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये देसाईगंजकडून अरततोंडीकडे जाणारे दुचाकीस्वारही अपघातग्रस्त वाहनांवर धडकले. या भीषण अपघातात धडकेनंतर टिप्पर गाढवी नदीपात्रात कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात ३ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास घडला. टिप्परचालक मंगेश बाळबुद्धे (वय २०) रा.भूयार ता.पवनी व प्रवीण मसराम (वय ३३) रा. निलज ता. पवनी हे एमएच ४० बीएल १९२२ या क्रमांकाच्या टिप्परने शंकरपूरवरून देसाईगंजकडे येत होते. तर एमएच ३३ एफ ३१२६ या क्रमांकाचा ट्रॅक्टर देसाईगंज येथून डोंगरमेंढाकडे जात असताना शंकरपूर-विसोरा मार्गावरील गाढवी नदीच्या पुलावर दोन्ही वाहनांची धडक झाली. यामध्ये ट्रॅक्टरचा चेंदामेंदा झाला. यावेळी ट्रॅक्टरचालक गुरुदेव प्रधान (वय ५०) रा. जुनी वडसा, राजेश विठ्ठल अंबारे (वय ३५) व जितू खोब्रागडे (वय ३५) दोघेही रा. डोंगरमेंढा हे ट्रॅक्टरमध्ये होते.अपघाताच्या वेळीच हरिराम बिसेन (वय ४०) व इशुलाल पटेल (वय ४५) दोघे रा. करंगी ता. गोंदिया हे एमएच ३७ एम २४०७ या क्रमांकाच्या दुचाकीने देसाईगंज येथून बांधकाम मजूर अरततोंडी गावाकडे जात असताना, त्यांची दुचाकी अपघातग्रस्त झाली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बावनकर यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली.यावेळी बघ्यांची गर्दी झाली. गडचिरोलीतील या घटनेचा व्हिडीओ सोशिअल मीडियावर व्हायरल होत असताना दिसतो आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments