उच्चभ्रू वस्तीत 'दम मारो दम'; झिंगलेल्या अवस्थेतील २२ तरुण अटकेत
उच्चभ्रू वस्तीत 'दम मारो दम'; झिंगलेल्या अवस्थेतील २२ तरुण अटकेत
नागपूर:-कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधाच्या काळातही शहरात दारुडे, गर्दुल्ल्यांचा उच्छाद कमी झालेला नाही. नशेच्या आहारी गेलेली तरूणाई छुप्या मार्गाने का होईना हुक्क्याचा दम मारत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री शहरात समोर आला. आहे. अंबाझरी आणि सिताबर्डी पोलिसांनी केलेल्या २ धडक कारवाईत शहरातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या भागात हवेली आणि फ्युजन या दोन हुक्कापार्लवर पोलिसांनी कारवाई केली. नशेत धूत असलेल्या २२ तरुणांना पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडून बेकायदेशीर गर्दी केल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.भरत नगर आणि सिताबर्डी येथे पोलिसांनी ही कारवाई केली. अमरावती मार्गावरील भरत नगरातल्या निवासी परिसरात हवेली नावाचा हुक्कापार्लर बेधडकपणे सुरू होता. येथे तरुण मुले मोठ्या प्रमाणात हुक्का पार्टी करतात अशी खबर अंबााझरी पोलिसांना मिळाली. पोलिसांची टीम तडक हुक्कापार्लवर पोचली असता तिथे ११ जण हुक्क्याचा दम मारताना पोलिसांना दिसले. कॅफेच्या नावाखाली हा हुक्का पार्लर सुरू होता. पोलिसांनी या हुक्का पार्लरचा मालक प्रेम जोरणकर (रा. कोराडी रोड), प्रीतम यादव ( रा. मानकापूर), हुक्का पार्लरवर काम करणारे 2 नोकर आणि अन्य ७ तरुणांवर कारवाई केली. मादक द्रव्य कायद्यासह वेगवेगळ्या कलमांतर्गत त्यांच्याववर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच वेळी पोलिस उपायुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सिताबर्डी पोलिसांनीही फ्युजन नावाने चालविल्या जात असलेल्या आणखी एका हुक्का पार्लरवर कारवाई करीत बेकायदेशीर हुक्का ओढणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही हुक्का पार्लरवर मिळून पोलिसांनी तब्बल २२ तरुणांवर कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले आहे. सरकारने यापूर्वीच हुक्का ओढण्यावर कायदेशीर बंदी घातली आहे. कोरोनाच्या संकट काळात राज्यात लॉकडाऊन असताना विषाणूची भिती पाहता सार्वजनिक ठिकाणी धुम्रपाावरही कायदेशीर बंदी आहे. या दोन्ही कायद्यांना झुगारून गर्दी केल्या प्रकरणी पोलिसांनी साथ रोग प्रतिबंधक कलमाखालीही या तरुणांवरगुन्हे दाखल केले आहेत. उशीरा रात्री पर्यंत ही कारवाई सुरू होती.
......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा