ग्रामीण भागात परप्रांतीय बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
ग्रामीण भागात परप्रांतीय बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
कोरपावली ता यावल :फिरोज तडवी कुठलीही वैद्यकीय पदवी घेतलेली नसताना ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर वर्ग यांच्या जीवाशी खेळ खेळत असलेल्य बोगस डॉक्टरणवर त्वरित कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा काही जाणकार व सुदण जाणकारांनतून करण्यात येत आहे, अधिक वृत्त असेंकी, कोविड 19 सारख्या सनसर्जन्य आजाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मोठया शिताफीने काम करीत असताना सम्पूर्ण वैद्यकीय तंत्रणा गुंतल्याने याचा फायदा उचलून बोगस डॉक्टरांनी आपली मर्जी नुसार व्यवसाय सुरू केला असल्याचे दिसून येते, त्यांच्या कडे बंगाल व युपी बहिर देशातले प्यारा मेडिकल सेटफिकित असून त्याना वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यास महाराष्ट्रात परवानगी आहेका स्तनिक पातळीवरील काही डॉक्टरांनी तालुका मेडिकल ऑफिसर यांच्या कडे चौकशी अर्ज सादर करून सुद्धा काही निष्पन्न झाले नाही, कोरोना काळात नागरिक भीती पोटी जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी न जाता या बोगस डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय सेवा करीत असतात, परंतु याचा फायदा उचलत समबंधीत बोगस डॉक्टर त्यांच्या जवळीलच गोळ्या औषधी देऊन मर्जी नुसार पैसे घेत असून नागरिकही भीती पोटी त्याना संगेलती फी देत आहेत,याआधीच मजूर वर्गाला हाताला काम नसताना डॉक्टरांना तेवडा अनामत रक्कम दयावी कशी असी चिंता व्यक्त करताना दिसून येते, वैद्यकीय पदवी कोणत्याही प्रकारची नसून देखील हे बोगस डॉक्टर मोठया आत्म विश्वासाने रुग्णांवर उपचार करीत असतात दिसून येतात,ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने या डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो, स्टिरॉईड ड्रमचा वापर करून रुग्णासाठी त्वरित आराम मिळतो परंतु जास्तीचा हाईडोसचा वापर करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असताना जिवीत हानी झाली तरी कोरोना काळात कोणीही डोके वर काढणार नाही, तरी यासर्व प्रकाराकडे शासनाने लक्ष केंद्रित करून जनतेला दिलासा देण्यासाठी उपाय योजना तयार कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे,
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
Comments
Post a Comment