पुण्यातील लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय; राजेश टोपेंकडून घोषणा
पुणे : पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.'राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानुसार आता पुण्यात सकाळी सात ते अकरा या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत,' असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.पुण्यात पॉझिटिव्हीटीचे प्रमाण ११.९ टक्के आहे. पुण्यातील प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रमाण नऊ टक्क्यांपर्यंत येईल, असा अंदाज असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.
इतर जिल्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा
राजेश टोपे यांनी राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची स्थिती नेमकी काय असेल, याबाबतही भाष्य केलं आहे. 'पॉझिटिव्हीटीचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन १५ जूनपर्यंत कायम राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून शिथिलता दिली जाणार आहे. याबाबतचे सविस्तर आदेश १ जून रोजी काढले जातील,' असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यातील निर्णयाबाबत महापौर काय म्हणाले?
'पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल,' अशी प्रतिक्रिया पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा