वन्यप्राण्यांनाही संसर्ग! हैदराबादमधील ८ सिंह करोना पॉझिटिव्ह
वन्यप्राण्यांनाही संसर्ग! हैदराबादमधील ८ सिंह करोना पॉझिटिव्ह
हैदराबादः देशात प्रथमच हैदराबादमधील नेहरू प्राणिसंग्रहालयातले ८ सिंह करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सेंटर फॉक सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीने (CCMB) २९ एप्रिलला प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना तोंडी माहिती दिली होती. आरटी-पीसीआर टेस्टमध्ये प्राणिसंग्रहालयातील ८ सिंहांना करोनाचा संसर्ग झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
वन्यप्राण्यांनाही संसर्ग! हैदराबादमधील ८ सिंह करोना पॉझिटिव्ह
सिंहांमध्ये करोनाची ही लक्षणं दिसली
प्राणिसंग्रहालयाचे संचालक सिद्धानंद कुकरेती यांनी ८ सिंह हे पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्ताचा इन्कारही केलेला नाही आणि या वृत्ताला दुजोराही दिलेला नाही. सिंहांमध्ये करोनाची लक्षणं दिसल्याचं कऱं आहे. पण आम्हाला अजून या सिंहांचा CCMB कडून आरटी-पीसीआर रिपोर्ट मिळालेला नाही. रिपोर्ट मिळाल्यावच यावर माहिती देऊ शकू, असं डॉक्टर कुकरेती म्हणाले.
न्यूयॉर्कमध्ये वाघ, सिंहाना झाला होता करोना
गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये ८ वाघ आणि सिंहांना करोनाचा संसर्ग झाला होता, असं हैदराबादमधील वन्यजीव संशोधक आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर शिरीष उपाध्ये यांनी सांगितलं. प्राण्यांमध्ये करोना संसर्गाचं वृत्त यापूर्वी आलं नव्हतं. पण हाँगकाँगमध्ये कुत्री आणि मांजरांमध्ये करोना व्हायर आढळून आला होता.
प्राणिसंग्रहालयात एकूण १२ सिंह
वन्यप्राण्यांची देखभाल करणाऱ्या पशुचिकित्सकांना २४ एप्रिलला या सिंहांमध्ये करोनासारखी लक्षणं दिसून आली. भूख न लागणं, नाकून पाणी येणं आणि कफ झाल्याचे दिसून आले होते, असं सूत्रांनी सांगितलं. या प्राणिसंग्रहालयात १२ सिंह आहेत. ते जवळपास १० वर्षे वयाचे आहेत. ४० एकावर हे प्राणिसंग्रहालय आहे.
प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी बंद
या घटनेनंतर प्राणिसंग्रहालय हे नागरिकांसाठी दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. हे प्राणिसंग्रहालय अतिशय दाट लोकवस्तीत आहे. करोना हवेतून पसरत असल्याने आजूबाजूच्या लोकवस्तीमुळे सिंहांना संसर्ग झाल्याचं बोललं जातंय. तसंच सिंहांची देखभाल करणाऱ्यांच्याम माध्यमातून त्यांना संसर्ग झाल्याचंही बोललं जातंय. अलिकडेच प्राणिसंग्रहालयात काम करणारे २५ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment