येत्या १२ तासांत 'यास चक्रीवादळ' भयंकर रुप धारण करणार

 





येत्या १२ तासांत 'यास चक्रीवादळ' भयंकर रुप धारण करणार


नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या १२ तासांत यास चक्रीवादळ धोकादायक रुप धारण करू शकतं. पूर्व - मध्य बंगालच्या खाडीवरून चक्रीवादळ यास गेल्या सहा तासांत जवळपास ९ किलोमीटर प्रती तासाच्या वेगानं उत्तर - वायव्य दिशेनं पुढे सरकताना आढळलं. येत्या १२ तासांत हे वादळ भयंकर रुप धारण करण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी सकाळपर्यंत उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या तटांना हे वादळ धडक देण्याची शक्यता आहे.


ओडिशा : मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गृहमंत्री दिव्यशंकर मिश्र यांना बालासोर जाण्याची आणि परिस्थितीवर नजर ठेवण्यसाठी तिथेच कॅम्प टाकण्याचे निर्देश दिले आहेत.


नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना चक्रीवादळाचा फटका बसणाऱ्या लोकांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलंय.


पश्चिम बंगाल : यास चक्रीवादळाआधी बंगालच्या दीघा भागात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४५ एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments