पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भिडल्या गगनाला! जाणून घ्या दर…
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भिडल्या गगनाला! जाणून घ्या दर…
करोना संकट आणि तौते चक्रीवादळाच्या संकटात लोक महागाईच्या संकटाचा देखील सामना करत आहेत. दिवसेंदिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळी गाठत आहेत. मार्च-एप्रिलमध्ये किरकोळ इंधन दरामध्ये जास्त दरवाढ झाली नाही. परंतु आतापर्यंत मेमध्ये एकूण १० दिवस तेलाच्या किंमती वाढविण्यात आल्या. सर्व मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रमी दराने विकले जात आहेत. दरम्यान, आज (बुधवार) इंधनाच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी मंगळवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २७ पैसे आणि डिझेलच्या किंमती २९ पैशांनी वाढ झाली होती.
काय आहेत आजचे दर
काल झालेल्या वाढीनंतर, दिल्लीत पेट्रोलची किंमत ९२.८५ रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८३.५१ रुपये झाले आहे. मुंबईत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल ९९.१४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९०.७१ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.५४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८८.३४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.९२ रुपये तर डिझेलची किंमत ८६.३५ रुपये प्रतिलिटर झाली आहे.
मे महिन्यात झालेली इंधन दरवाढ
मे महिन्यात आतापर्यंत दहा वेळा इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. या महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.४६ आणि डिझेलच्या दरात २.७८ रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारी क्रूडच्या किंमती मार्चमध्ये झालेल्या वाढीपेक्षा अधिक होत्या. 15 मार्चनंतर प्रथमच ब्रेंट क्रूड तेलाची किंमत ७० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त झाली होती. त्यानंतर काल वाढ झाली होती. पण आज किंमती स्थिर आहेत.
या दहा दिवसांच्या वाढीनंतर देशातील बर्याच राज्यात पेट्रोल १०० च्या वर गेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बर्याच शहरांमध्ये यापूर्वीच किंमतींनी १०० रुपयांची मर्यादा ओलांडली होती आणि कालच्या वाढीसह मुंबईतील किंमतही १०० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. मुंबईत आता एक लिटर पेट्रोलची किंमत ९९.१४ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.७१ रुपये आहे.व्हॅट आणि फ्रेट शुल्कासारख्या स्थानिक करांमुळे इंधनाचे दर राज्यात वेगवेगळे असतात. राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक मूल्य वर्धित कर (व्हॅट) लादला जातो. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १०३.८० रुपये आणि ९६.३० रुपये प्रति लिटर विकले जात आहेत.
चेक करा तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर
देशात तेलाच्या दरात दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू होतात.आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment