करोनामुळं आई-वडील गमावलेल्या बालकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय



 करोनामुळं आई-वडील गमावलेल्या बालकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय


कोल्हापूरः जिल्ह्यात करोनामुळे ज्या मुलांच्या पालकांचे निधन झालं आहे, अशा मुलांचे पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार असल्याचे जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. या मुलांची माहिती संकलित करण्यात येत असून त्यानंतर काहींना दत्तकही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, करोना संसर्गामुळे बरोबर अनेक कुटूंबातील कर्त्या पुरूषांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. आज अखेर जवळपास जिल्ह्यातील ४५ मुलांच्या आई वडिलांपैकी एकाचा करोनाने मृत्यू झाला आहे. अशा मुलांच्या सामाजिक आणि शैक्षणिक भविष्याचे नुकसान होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे. त्यांच्या भवितव्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. करोनामुळे अनेक मुलांना आपल्या आई-वडिलांना गमवावे लागले. त्यांच्या डोक्यावरील छत्र हरवल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी कोण करणार? असा प्रश्न आता समाजात निर्माण होऊ लागला आहे. जिल्ह्यात ४५ मुलांचे आई किंवा वडील नसल्याचे समोर आले आहे. तसेच दोन मुलांचे आई-वडील असे दोन्ही हिरावून घेतल्याचे समोर आले आहे. अशा मुलांची पालनपोषणाची जबाबदारी आता कोल्हापूर जिल्हा प्रशासन घेणार आहे. वेळ पडल्यास त्यांना जिल्हा प्रशासन दत्तक ही घेणार असल्याची तयारी केली जात आहे. तसेच आणखी माहिती घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू आहे, असं पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं आहे. कणेरीवाडी येथील सिद्धगिरी मठाच्या वतीने अशा अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्याचे जाहीर केले होते. तशी प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. यामुळे मातापित्यांचे छत्र हरविलेल्या मुलांना आधार मिळत आहे. तर आता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा आदर्श राज्यातील सर्वच जिल्हा प्रशासनाने घेतला तर अशा मुलांचा फार मोठा प्रश्न मिटणार आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments