राज्यासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली 'ही' चिंता




 राज्यासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली 'ही' चिंता


मुंबईः करोना संसर्गातून बरे होत असताना दुसरीकडे ब्लॅक फंगस(म्युकरमायकोसिस) या आजाराचे नवीन आव्हान आरोग्य प्रशासनापुढे उभे राहिले आहे. म्युकरमायोकसिस या बुरशीजन्य आजाराने बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या राज्यात या आजाराचे ८५० अॅक्टिव्ह रुग्ण असताना महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. या आजारावर उपचार करणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यानं पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असल्याचं, विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.'या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शनचा सध्या राज्यात तुटवडा आहे. त्यासाठी दोन लाख इंजेक्शनची गरज आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. पण ती इंजेक्शन ३१ मेनंतरच उपलब्ध होणार आहेत. तोपर्यंत पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत,' अशी चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.'करोना रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीने महाराष्ट्रावर हल्ला चढवला आहे. या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं आरोग्य यंत्रणेची एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढाई सुरु आहे. या आजारावर इंजेक्शन उपलब्ध आहेत. पण रुग्णावाढीच्या तुलनेनं या इंजेक्शनचा तुटवडा आहे,' असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.दरम्यान, म्युकरमायकोसिस पंधरवड्यापासून वेगाने पसरत आहे. रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली. त्यावर उपाय करण्यासाठी इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या बुरशीला रोखण्यासाठी ‘अॅम्फोटेरेसिन बी’ हे इंजेक्शन दिले जाते. आतापर्यंत या इंजेक्शनला मागणी नव्हती. संपूर्ण देशात ‘अॅम्फोटेरेसिन बी’इंजेक्शनची मागणी दहा हजारहून कमी होती. त्यामुळे संबंधित कंपन्यांकडून नाममात्र उत्पादन केले जात होते. आता मागणी अचानक वाढल्यानं राज्यात इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. 'म्युकर’च्या उपचारासाठी नजिकच्या काळात इंजेक्शनची मागणी लक्षात घेऊन उत्पादनावर भर देण्यात आला आहे. वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीमधून जूनच्या पहिल्या आठवड्यात हे इंजेक्शन उपलब्ध होईल, असं सांगण्यात येत आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments