जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट




जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट


रत्नागिरी:- रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या बदलीचा बनावट जीआर काढल्याप्रकरणी पोलीस तपास सुरू असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला सायबर फसवणुकी जागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारे  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्याच नावाने फेसबुकवर फेक अकाउंट  उघडल्यात आल्याचे उघड झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी काही नागरीकांच्या बाबतीत हा प्रकार घडला होता. फेक अकाउंटद्वारे लोकांना फसविण्याचे काम सायबर गुन्हेगार करीत असतात  पण आता खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांच्या नावाने कोणीतरी अज्ञातांने फेक  फेसबुक अकाऊंट  उघडल्याचे  साेमवारी उघड झाले आहे. या नावाने जर रिक्वेस्ट आली तरी कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन डॉ. गर्ग यांनी केले आहे. नागरिकांनी सोशल मिडियाचा वापर करताना जपून करावा व काही गैरप्रकार आढळला तर रत्नागिरी सायबर सेलच्या ८८८८९०५०२२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments