संतापजनक! फेसबुकवरून ओळख झालेल्या व्यक्तीकडून तरुणीवर अत्याचार



 संतापजनक! फेसबुकवरून ओळख झालेल्या व्यक्तीकडून तरुणीवर अत्याचार


नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना हिंगणा भागात उघडकीस आली. २९वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी २८वर्षीय युवकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.शुभम जगदीश हुड (रा. उमरेड रोड, दिघोरी) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ती नोकरीच्या शोधात होती. नोव्हेंबर २०१९मध्ये तिची फेसबुकवर शुभमशी ओळख झाली. शुभमने तिला वागधऱ्यातील एका कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. कंपनी दाखविण्याच्या बहाण्याने त्याने तिला वागधरा येथे बोलाविले. 'सध्या काम सुरू असून लवकरच कंपनी सुरू होईल. येथे तुला चांगल्या पदावर नोकरी लावून देईल', असे शुभम तिला म्हणाला. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यावर सतत अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. नोकरीही लावून दिली नाही. तिला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीने हिंगणा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुभमला अटक केली.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments