घरगुती कारणावरून पुतण्याला मारहाण

 


घरगुती कारणावरून पुतण्याला मारहाण 


लांजा:-घरगुती कारणावरून बेकायदा जमाव जमून 30 वर्षे तरुणाला मारहाण तसेच त्याच्या पत्नी आणि आईला शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना लांजा मधली कुंभारवाडी येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी लांजा पोलिसांनी तरुणाचे चुलते आणि त्याच्या कुटुंबातील पाच जण अशा एकूण सहा जणांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा मधली कुंभारवाडी येथे राहणारे बाळकृष्ण वसंत कुंभार( वय ३०) आणि तानाजी कुंभार (वय 54) हे नात्याने चुलते -पुतणे आहेत. त्या दोन्ही कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू आहेत. शुक्रवारी 28 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान याच घरगुती कारणावरून तानाजी कुंभार यांनी बाळकृष्ण कुंभार यांच्या घरी जाऊन गैरकायदा जमाव करून बाळकृष्ण कुंभार यांच्या पत्नीस शिवीगाळ तसेच ठार मारण्याची धमकी तसेच आईला देखील शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी देत लाकडी दांडा आणि कोयत्याने मारहाण केली. या घटनेत बाळकृष्ण कुंभार हे जखमी झाले याप्रकरणी बाळकृष्ण कुंभार यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.यानुसार पेलीसांनी तानाजी कुंभार (वय 54) एकनाथ गुडेकर (वय 45 )स्नेहल तानाजी कुंभार (वय 28) प्रमिला तानाजी कुंभार (वय 25 ) गौरी तानाजी कुंभार (वय 25) स्मिता तानाजी कुंभार (वय 25) या सहा जणांवर भादवि कलम 153, 147, 148 ,145, 324, 323, 504 ,506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे .लांजा पोलिस ठाण्यात शनिवारी २९ रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments