अवैध वाळू उत्खनन प्रकरणी ५ संशयिताना अटक व जामीन



अवैध वाळू उत्खनन प्रकरणी ५ संशयिताना अटक व जामीन 


दापोली:-दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीतील अडखळ, सारंग या ठिकाणाहून ६१ लाख ६० हजार रुपये किमतीची १ हजार ५४० ब्रास वाळू चोरीप्रकरणी ५ संशयिताना दापोली पोलिसांनी अटक केली होती. दोन दिवसांनी म्हणजेच शनिवारी त्यांना न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणी संशयित रिझवान काझी,गुलाम हमदुले,दिनेश यशवंत कदम,अकबर काझी,बिलाल काझी दापोली पोलिसांनी ५ संशयितांना आज अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २९ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. २९ रोजी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.या सगळ्या प्रकरणची आंजर्लेचे मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांच्या आदेशाने निवासी नायब तहसीलदार सुरेश खोपकर, आंजर्लेचे मंडळ अधिकारी सुधीर पारदुले, दापोलीचे मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर, आंजर्लेचे तलाठी उत्तम पाटील, गिम्हवणेचे तलाठी गुरुदत्त लोहार, अडखळचे तलाठी आदित्य हिरेमठ, ताडीलचे तलाठी साईनाथ मिरासे, दापोलीचे तलाठी दीपक पवार, हर्णेचे बंदर निरीक्षक गवारे यांच्या पथकाने आंजर्ले खाडीत होडीने जाऊन म्हैसोंडे पाटीलवाडी येथे उतरून पहाणी केली.मौजे अडखळ येथील सर्व्हे नंबर 22/104 येथे संशयित रिझवान काझी यांनी अनधिकृत वाळू उत्खननाचा प्लॉट तयार करुन 19 लाख 20 हजार रुपये किमतीची सुमारे 480 ब्रास वाळू , सर्व्हे नंबर 35/1 व 34/3 मध्ये संशयित दिनेश यशवंत कदम यांनीही अनधिकृत वाळू उत्खननाचा प्लॉट तयार करुन 13 लाख रुपये किमतीची 325 ब्रास वाळू, सर्व्हे नंबर 37/4 मध्ये संशयित बिलाल काझी यांनी 16 लाख रुपये किमतीची 400 ब्रास वाळू, सव्हें नंबर 37/5 मध्ये संशयित अकबर काझी यांनी 2 लाख 40 हजार रुपये किमतीची 60 ब्रास वाळू, मौजे सारंग येथील सर्व्हे नंबर 26/1 येथे संशयित गुलाम हमदुले यांनी 11 लाख रुपये किमतीची 275 ब्रास वाळू चोरी केल्याचा अंदाज तेथे असलेल्या खडशाच्या साठयावरुन महसुल विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला होता.वाळू चोरीचा हा अंदाज व्यक्त करुन मंडळ अधिकारी सुधीर पारदुले व मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी प्रत्येक ठिकाणचे पंचनामे केले होते. आंजर्लेचे प्रभारी मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांनी दापोली पोलिस ठाण्यात वाळूचे उत्खनन करुन चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार 5 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या 5 संशयितांना आज अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत.



......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments