सोळा वर्षाच्या मुलीचा विनयभंग; ६५ वर्षीय वृद्धाविरोधात गुन्हा दाखल
सोळा वर्षाच्या मुलीचा विनयभंग; ६५ वर्षीय वृद्धाविरोधात गुन्हा दाखल
राजहीलनगरमध्ये राहणारा हा ६५ वर्षीय वृध्द मंगळवारी (दि. २५) पिडीत मुलीच्या काकाकडे गेला. मुलीचे काका ऑटो चालवण्याचा व्यवसाय करतात. काका घरी आहे का, असे वृद्धाने तीला विचारले, त्यावेळी मुलीने काका घरी नसल्याचे सांगितले. त्यानंतर वृध्दाने मुलीशी लगट केली. या प्रकारामुळे मुलगी घाबरली व ती ओरडली. त्यावेळी घरात पिडीत मुलीच्या दोन लहान बहिणी होत्या, त्या बाहेर आल्यानंतर हा चाळे करणारा वृध्द घरातून निघून गेला.या प्रकरणाची पीडित मुलीने तिच्या काकांना माहिती दिली. त्यामुळे त्यानी तातडीने घरी धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणी मुलीने बुधवारी राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अश्लिल चाळे करणाऱ्या या ६५ वर्षीय वृध्दाविरुध्द विनयभंग, पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा