जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा बनावट आदेश व्हायरल प्रकरणी आणखी एकाला अटक




 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा बनावट आदेश व्हायरल प्रकरणी आणखी एकाला अटक


रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीचा खोटा आदेश व्हायरल प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी अर्जुन सकपाळ याला मदत करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अक्षय आनंदा बुडके (२८, रा. कोथळी, करवीर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. अक्षयला रत्नागिरी शहर पोलिसांनी बुधवारी पहाटे रत्नागिरीतच अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असते त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर करीत आहेत.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments