मी पाहिलेले सपन:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
मी पाहिलेले सपन
रातच्याला मी सुंदर ते सपन पाहिले
छान आदर्श सुंदर ते सपन पाहिले......
जिकडे तिकडे फार आनंदी आनंद
प्रत्येकाचे सुंदर ते मन पाहिले......
लहान मोठ्यांचा इथे सन्मान होतोय
वर्तनाने सुंदर ते जण पाहिले......
सर्वचं सणाला भेटून शुभेच्छा देतात
परंपरेचे सुंदर ते सण पाहिले......
जणूकाही वाटे आदर्शच तेथील धर्म
माणसात सुंदर ते सज्जन पाहिले......
हसत खेळत जगावे येथून शिकावे
आपसातील सुंदर ते रंजन पाहिले......
टाळ पेटी मृदंगाचा तालबद्ध गजर
मधूर सुंदर ते भजन पाहिले......
शेजा-यांमध्ये ही अतूट प्रेम जीव्हाळा
पुर्वजांचे सुंदर ते वजन पाहिले......
श्रमास लक्ष्मी समजून राबराबती
मेहनतीत सुंदर ते मगन पाहिले......
नसे कलह मुळी नाही भांडणे सर्वत्र
अपशब्द बोलणारे ना दुर्जन पाहिले......
संतुष्ट समाधानी अशी निस्वार्थी जनता
सर्वांच्या तोंडी सुंदर ते गुंजन पाहिले......
विश्वास आपुलकी सर्व धर्म सहिष्णुता
सत्यवृध्दी सुंदर ते प्रज्वलन पाहिले......
कोमल शितल शुद्ध मंजूळ वाणी
वागताना सुंदर ते सर्वजण पाहिले......
दया माया क्षमा शांती ममता समता
सत्याच्या ज्योतीचे सुंदर ते ज्वलन पाहिले......
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा