'यास' चक्रीवादळाची धास्ती : रेल्वेकडून आणखी २५ गाड्या रद्द




 'यास' चक्रीवादळाची धास्ती : रेल्वेकडून आणखी २५ गाड्या रद्द




नवी दिल्ली : लवकरच पूर्व भारताला धडक देण्याच्या तयारीत असलेल्या 'यास चक्रीवादळा'च्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रशासनाकडून काही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व रेल्वेनं २४ मे ते २९ मे दरम्यान चालणाऱ्या २५ रेल्वेगाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियाद्वारे रेल्वे प्रशासनानं ही घोषणा केलीय. यामध्ये बिहारच्याही काही गाड्यांचा समावेश आहे.याअगोदर 'यास' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता भारतीय रेल्वेनं एकूण ८६ रेल्वे रद्द केल्या आहेत. २३ मे ते २८ मे दरम्यान चालणाऱ्या दिल्ली ते पुरी, भुवनेश्वर ते यशवंतपूर अशा अनेक गाड्यांचा यात समावेश आहे.भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी बंगालच्या पूर्व-मध्ये खाडीवर दिसलेलं सौम्य दबाव क्षेत्रानं रविवारी आपला दबाव थोडा वाढवला आहे. सोमवारी सकाळपर्यंत हा दबाव 'चक्रीवादळात' रुपांतरीत होऊ शकेल. २६ मे रोजी सायंकाळी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या तटांना हे चक्रीवादळ धडक देण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग १५५ ते १६५ किलोमीटर प्रती तास असू शकतो. तो १८५ किमी प्रती तासांपर्यंत वाढू शकतो. यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलीय.याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या एका बैठकीत 'यास' चक्रीवादळाला तोंड देण्यासंबंधीच्या तयारीची माहिती घेतली.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112




Comments