वाटद जिल्हा परिषद गटात शिवसेनेतर्फे पत्रे वाटप





 वाटद जिल्हा परिषद गटात शिवसेनेतर्फे पत्रे वाटप


रत्नागिरी:-तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. घरांची कौले, पत्रे उडाले तर आंब्यांची झाडे तुटून पडली. झाडाखाली आंब्याचा खच पडला. ठीक ठिकाणी आंब्याचे ढीग दिसत होते. प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अधिकारी यांना पंचनामे करून लवकर मदत कशी देत येईल याकडे लक्ष द्या असे आदेश दिले. मंत्री उदय सामंत एवढ्यावरच न थांबता पूर्ण जि.प.गटातील वादळाने उडालेले पत्रे शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतः लगेचच पत्र्यांची व्यवस्था करून आपले पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत गावागावात जाऊन पत्रे वाटप करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख बाबय कल्याणकर, जि.प.सदस्या, जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.ऋतुजा जाधव, पंचायत समिती सभापती सौ.संजना माने, वरवडे गणाच्या सदस्या सौ.मेघना  पाष्टे, उपविभाग प्रमुख अजीम चीकटे, विभाग संघटक उदय माने, जयगड सरपंच सौ.फरजना डांगे, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, भाई जाधव, अनिरुद्ध साळवी, ऋषीराज धुंधुर, आदेश पावरी, राजेश जाधव, सुवर्णा पागडे तसेच अनेक  शिवसैनिक उपस्थित होते.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या