जगवा दीनाला:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
जगवा दीनाला..…
सुखाचे दर्शन । अशक्य दीनास ।
दुःख हमखास । त्यांच्यापुढे ।।
मनाला टोचले । ऐसे बोलतात ।
तुच्छ जाणतात । कावेबाज ।।
थोडेसे खाऊन । अन्न घाली वाया ।
रोगयुक्त काया । गर्विष्ठांची ।।
कोठारात धान्य । जातसे सडून ।
गरीब मरून । जातो जेव्हा ।।
काय परिस्थिती । माझ्या भारताची ।
जाण कर्तव्याची । नाही कुणा ।।
कधी उठणार । कोणी मदतीला ।
भुलून जातीला । कोण जाणे? ।।
शिल्लक असेल । तरच मागतो ।
दुःख लपवतो । हसुनिया ।।
गरिबास जणू । शापच लागला ।
नेहमी झटला । सुखासाठी ।।
संचार बंदीत । दीनांचे मरण ।
संपत्ती जतन । त्यांचे नाही ।।
त्यात महागाई । काम नाही हाती ।
फाटणार छाती । कैसी नाही? ।।
विनंती करतो । अजु समाजाला ।
जगवा दीनाला । सुखामध्ये ।।
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment