तपास घ्या:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास





तपास घ्या


कुणाच्या जीवनात दुःखाचा अंत नाही
कुणाच्या जीवनात सुखाचा अंत नाही......

कुणी पैशात लोळती तर कुणा पैसा न दिसे
लाचारी दाखविण्या तयार गरजवंत नाही......

हवेचे प्रदूषण भयंकर वाढले आहे
काबाड कष्ट करणे कुणा पसंत नाही......

स्वार्थ मतलबी लोकांचा भरला बाजार
एकमेकां बोलण्यास कुणा उसंत नाही......

श्रीमंत गरीब दरी वाढतचं चालली
लोकप्रतिनिधींना मात्र याची खंत नाही......

जे लोकांना ढगविण्या ध्यानस्थ बसतात
धन लुबाडणारे खरे महंत नाही......

देवाच्या नावावर चमत्कार करतात
फसवेगिरी करणारे खरे संत नाही......

देश महासता बनत चालला जगात
ख-या जटील समस्यांचा प्रश्न ज्वलंत नाही...... 

जातच नाही ती जात अतिशय दुष्ट प्रथा
जातीयता करणे कोणताच सांगत पंत नाही......

सदासर्वदा सुकलेल्या उदास मनाला
आनंद देण्या सर्वदा येत वसंत नाही......



देविदास हरीदास वंजारे 
ता.किनवट जि.नांदेड
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 





२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments