ओशीवळे-परटवली येथील दुचाकी अपघातातील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यु
ओशीवळे-परटवली येथील दुचाकी अपघातातील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यु
राजापूर:-दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व जिल्हा शासकिय रूग्णालय उपचार सुरू असलेल्या दिपक चद्रकांत जोशी (४०) रा. ओशीवळे बौध्दवाडी या प्रौढाचा उपचार सुरू असताना मृत्यु झाला आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी मयत दिपक जोशी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.शनिवारी २२ मे रोजी ओशीवळे ते परटवली मार्गावर हा अपघात झाला होता. तर दिपक याचा शुक्रवारी २८ मे रोजी मृत्यु झाला असून पोलीसांनी शनिवारी २९ मे रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.दीपक जोशी हा आपल्या ताब्यातील स्पेल्डर दुचाकी घेऊन ओशीवळे येथून परटवलीकडे जात असताना परटवली रोडवर हा अपघात झाला होता. यानंतर गंभीर जखमी झालेल्या दिपक जोशी याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी मृत्यु झाला आहे.या प्रकरणी राजापूर पोलीसांनी मयत दिपक जोशी याच्या विरोधात भा. द. वि. कलम ३०४ अ. २७९, ३३७, ३३८, मोटार वाहतुक कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हयगयीने व अतिवेगाने गाडी चालवून स्वताच्या मृत्युस कारणीभुत ठरला म्हणून पोलीसांनी दिपक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल कमलाकर तळेकर व पोलीस कातरे करत आहेत.
......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment