धक्कादायक! निगेटिव्ह महिलेने कोविड पॉझिटिव्ह बाळाला दिला जन्म, डॉक्टरही हैराण



धक्कादायक! निगेटिव्ह महिलेने कोविड पॉझिटिव्ह बाळाला दिला जन्म, डॉक्टरही हैराण



वाराणसीः वाराणसीत एक अनोखी घटना समोर आली आहे. एका निगेटिव्ह गर्भवती महिलेने करोना पॉझिटिव्ह मुलीला जन्म दिला आहे. बीएसयूच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये करोना निगेटिव्ह महिलेने पॉझिटिव्ह मुलीला जन्म दिल्याने डॉक्टरांनाही धक्का बसला आहे.वाराणसीत एकीकडे जगाला करोनामुक्त करण्यासाठी यज्ञ सुरू आहे. दुसरीकडे एका गर्भवती महिलेने २५ मे रोजी करोना व्हायरसचा संसर्ग असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी २३ मे रोजी तिची करोना चाचणी करण्यात आली होती. करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर या महिलेने २५ मे रोजी एका पॉझिटिव्ह मुलीला जन्म दिला. सुदैवाने बाळासह आईची प्रकृतीही आता चांगली आहे. पण मुल करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने डॉक्टरांनाही धक्का बसला.वाराणसीत देशातील ही पहिली अशी घटना समोर आलीय जी शास्त्रज्ञांनाही विचार करायला लावणारी आहे. देशात करोना संकटाच्या या काळात अनेक पॉझिटिव्ह गर्भवती महिलांनी मुलं जन्माला घातली. पण त्यातील एकही बाळ करोना पॉझिटिव्ह नव्हता. पण वाराणसीत हा वेगळा प्रकार घडल्याने डॉक्टर अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत आहेत. हॉस्पिटलमध्ये आई-बाळाला वेगवेगळं ठेवण्यात आलं आहे. महिलेने पॉझिटिव्ह बाळा जन्म दिल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना धक्काच बसला आहे. एखाद्यावेळस जगातील ही पहिलीच घटना असावी. आई आणि बाळाची प्रकृती चांगली आहे. त्यांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या दुर्मिळ घटनेची पुन्हा तपासणी केली जाईल, असं सीएमओकडून सांगण्यात आलं आहे.



......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments