जिल्ह्यातील २ लाख नागरिक अंधारात




 जिल्ह्यातील २ लाख नागरिक अंधारात


 रत्नागिरी:-  ताैक्ते चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वाढलेला वेग व पर्जन्यवृष्टी यामुळे जिल्ह्यातील महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर हे चार फिडर पूर्णत: बंद असून, देवरूख फिडरचा शहरासहित निम्मा भाग बंद आहे. जिल्ह्यातील २ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे.वादळाचा वेग वाढल्यानंतर महावितरणने खबरदारी घेत दुपारी २ वाजल्यापासून वीज पुरवठा बंद केला होता. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग कायम होता. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत करण्यात अडचण येत हाेती़ वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर बाधित भाग वगळता अन्य ठिकाणचा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला हाेता.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org