पोलीस पाठलाग करत असल्याचं पाहून आधी आली चक्कर, मग काही वेळातच...; अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार
पोलीस पाठलाग करत असल्याचं पाहून आधी आली चक्कर, मग काही वेळातच...; अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार
सोलापूर : अवैध व्यवसायिकांच्या घरावर छापा टाकायला आलेल्या पोलिसांना घाबरून पळून जाताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नागेश हेगडे असं या २४ वर्षीय तरुणाचे नांव असून सदरची घटना मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथे घडली आहे.या घटनेतील तरुणाचा मृत्यू हा पोलिसांच्या पाठलागामुळे झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आणि मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. शेवटी अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी या घटनेची उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले आहेत.नंदुर तालुक्यातील मंगळवेढा इथे हेगडे परिवारातील एक सदस्य अवैध व्यवसाय चालवतात. तसा गुन्हा यापूर्वी दाखल झालेला आहे. त्याच आधारे शुक्रवारी सकाळी १०:३० च्या सुमारास पोलीस अधिकारी व कर्मचारी गावातील हेगडे यांच्या दारू धंद्यावर कारवाई करण्यासाठी येताच त्यांना पाहून नागेश नाथा हेगडे( वय २४) हा युवक पळून जात होता.यावेळी पोलीस आपला पाठलाग करत असल्याचं पाहून काही अंतरावर तो चक्कर येऊन कोलमडून खाली पडला. त्यात तो बेशुद्ध झाला. त्याला गावातील डॉक्टराकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला उपचार करणेसाठी मंगळवेढा रुग्णालयाकडे नेण्यास सांगितले. त्यानुसार महिला हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.यानंतर संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह मंगळवेढा पोलीस ठाण्यासमोर आणला आणि संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी ठाण मांडले. जवळपास ३ तास मृत्यूदेह गाडीत ठेवला होता. याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भेट देऊन कुटुंबियांशी चर्चा करून चौकशी करून दोषी असणाऱ्या पोलीसावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.यावेळी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप व पोलिस अधिकारी उपस्थित होते. याची फिर्याद वडिल नाथा हेगडे यांनी दिली आहे. त्यानंतर तो मृत्यूदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतला. याची सखोल चौकशी करण्यासाठी पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. सदर मयताची नोंद सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात म्हणून नोंद केली आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment