राजापूर वरची पेठ येथील एका महाशयाने जमीन विकसित करण्यासाठी नैसर्गिक वहाळावर घातला आडवा बांद, नजिकच्या घरांना धोका
राजापूर वरची पेठ येथील एका महाशयाने जमीन विकसित करण्यासाठी नैसर्गिक वहाळावर घातला आडवा बांद, नजिकच्या घरांना धोका
रत्नागिरी:-राजापूर शहरातील वरची पेठ येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गानजिक जुन्या नैसर्गिक वहाळावर आडवा बांद घालण्यात आल्याने त्या परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या वहाळाला पाणी असते. मात्र हा बांद घातल्याने पाण्याची दिशा बदलू शकते किंवा बांद फुटू शकतो. मात्र अद्याप राजापूर नगर परिषदेने ठोस अशी कार्यवाही केलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक अनधिकृत बांधकामे जिल्हा प्रशासनाने जे.सी.बी. लावून पाडून टाकली आहेत. मग राजापूर नगर परिषद वरची पेठ येथील वहाळावर घातलेला हा आडवा बांद जे.सी.बी.च्या सहाय्याने का पाडून टाकत नाही?, राजापूर नगर परिषद प्रशासन नेमका कोणता विचार करित आहे असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. राजापूरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गानजिक वरची पेठ येथे एक जुना वहाळ आहे. पूर्वी या वहाळाला बारमाही पाणी असायचे. आता ऊन्हाळ्यात वहाळाला पाणी नसते. मात्र शहरातील एका महाशयाने आपल्या जमिनिच्या विकासासाठी वहाळात माती, दगड यांचा भराव टाकला आहे. हा महाशय एवढ्यावरच थांबला नाही. तर वहाळावर चक्क सिमेंट कॉंक्रीट बांदच घातला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या वहाळाला पाणी आल्यास ते कुठून वाहत जाणार?, अशा परिस्थीतित नजिकच्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात एका नगरसेविकेने राजापूर नगर परिषद प्रशासनाकडे पत्रही दिले आहे. मात्र या पत्रावर संबंधितास केवळ नोटिस बजावण्याचे काम केले. खरे तर पावसाळ्यापूर्वीच राजापूर नगर परिषदेने हा अनधिकृत बांद तोडला पाहिजे. मात्र राजापूर नगर परिषद प्रशासन तसे करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा