पिरलोटे येथे आढळला परप्रांतीय तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह
पिरलोटे येथे आढळला परप्रांतीय तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह
खेड : तालुक्यातील पिरलोटे एका घराच्या गच्चीवर दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव ब्रिजेश मिश्रा (२२, रा.पिरलोटे स्टॉप, धामणदिवी, खेड मूळ राहणार मैडी, ता. मडीयाह, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) याचा मृतदेह तो राहत असलेल्या गच्चीवर नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू दि. २८ ते २९ सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान झाल्याचा संशय या घटनेची माहिती पोलिसांना देणारे सौरभ ब्रिजेश मिश्रा (२७. रा. पिरलोटे स्टॉप.धामणदिवी.खेड मळ राहणार मैडी, ता. मडीयाह, जि. जौनपर, उत्तरप्रदेश) यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी गौरव मिश्राच्या मृत्यूबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सरू आहे.
.......................................
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा