31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय ऑनलाइन वेबिनार संपन्न

 



31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय ऑनलाइन वेबिनार संपन्न



सलाम मुंबई फाऊंडेशन या संस्थेद्वारे 1 मे ते 31 मे पर्यंत 2021 ““ तंबाखू सोडण्यास वचनबद्ध”” हे ऑनलाइन शपथ घ्या प्रमाणपत्र मिळवा या उपक्रमात सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्र कांबळे यांनी सहभाग घेऊन महाराष्ट्र राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील, सर्व  अधिकारीवर्ग, सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांना सलाम मुंबई फाऊंडेशन तर्फे ऑनलाइन प्रमाणपत्र मिळण्याकरिता लिंक सेंड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून 25,300 लोकांना प्रमाणपत्र मिळाले. यामध्ये साहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्र कांबळे यांनी राष्ट्रीय स्तरावर 2 क्रमांक पटकाविला.जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध हा मुख्य विषय घेऊन जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन वेबिनार घेऊन उपस्थित सर्व अधिकारी यांना महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे संचालिका डॉ. साधना तायडे मॅडम यांच्या हस्ते विजयत्यांचे नाव घोषित करण्यात आले. सलाम मुंबई फाऊंडेशन तंबाखू मुक्त अभियान यावर करत असलेल्या कामाविषयी कौतुकास्पद असल्याचे सांगितल्या. सेक्स द युनियनचे डेपुटी रेजी ओनल डायरेक्टर साउथ ईस्ट एशिया चे डॉ. राणा सिंग यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना तंबाखू विषयी मार्गदर्शन केले. सलाम मुंबई फाऊंडेशन या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तंबाखू मुक्त शाळा हा अभियान शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्याबरोबर काम करीत आहे. सहाय्यक सेवाभावी संस्था सांगली, सातारा ,कोल्हापूर रत्नागिरी आणि कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यामध्ये सलाम मुंबई फाऊंडेशन बरोबर गेले चार वर्षापासून तंबाखू मुक्ती साठी काम करीत आहे. संस्थेमार्फत तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने कोरोना चा संसर्ग कशा रीतीने होतो यासाठी वेगवेगळे ऑनलाइन वेबिनार घेऊन समाजातील अनेक लोकांनमध्ये जन - जागृतीचे काम करण्यात येत आहे. तंबाखू मुक्ती ची शपथ सलाम मुंबई फाऊंडेशन चे अधिकारी श्री दीपक पाटील यांनी घेतली तर सूत्रसंचालन श्री दीपेश ठक्कर यांनी घेतली तसेच कार्यक्रमाचे आभार श्री आदेश नांदवीकर यांनी मानले.सदर ऑनलाइन वेबिनार साठी आरोग्य विभागाचे संचालिका डॉ. साधना तायडे मॅडम, द युनियनचे डॉ. राणा सिंग, सलाम मुंबई फाऊंडेशन चे जनरल मॅनेजर कल्पना पिलाई मॅडम, श्री संजय ठाणगे, शुभांगी लाड, जयेश माळी, गटशिक्षणाधिकारी श्री.प्रदीपकुमार कुडाळकर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री रविंद्र कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री रामचंद्र टोणे, विस्ताराधिकारी छायादेवी माळी, सहाय्यक सेवाभावी संस्थेचे सचिव सौ ज्योती राजमाने,पोपट कांबळे, ओमकार कुंजीरे, अक्षय शेडबाळे, गंगाराम कांबळे उपस्थित होते.


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments