रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित कुमार गर्ग यांनी MR फार्मा या कंपनीत आगीची दुर्घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी दिली भेट
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित कुमार गर्ग यांनी MR फार्मा या कंपनीत आगीची दुर्घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी दिली भेट
रत्नागिरी :-खेड तालुक्यातील लोटे MIDC येथील औद्योगिक वसाहतीतील एम.आर.फार्मा कंपनीत दिनांक 28/04/2021 रोजी सकाळी 11.15 वा.सुमारास भीषण आग लागली होती. सदर घटनेत कोणीही जखमी झाले नसून घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलांकडून ही आग विझविण्यात आली.काही दिवसांपूर्वीच लोटे MIDC मधील घरडा केमिकल्स व त्यानंतर समर्थ केमिकल्स या कंपन्यांमध्ये लागलेल्या आगीमध्ये एकूण 09 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर काही कामगार जखमी झाले होते. बुधवारी पुन्हा MR फार्मा या कंपनीत आगीची दुर्घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित कुमार गर्ग यांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ लोटे येथील सदर घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक यांनी कंपनी व्यवस्थापनाकडून घटनेबाबत माहिती घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच या घटनेच्या अनुषंगाने तपासाच्या दृष्टीने सदर वेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग शशीकिरण काशिद, खेड पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव यांना योग्य त्या सूचना दिल्या. सदर घटनेचा तपास खेड पोलीस करत आहेत.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा