कुळवंडी स्मशानभूमीलगत प्रौढाचा मृतदेह आढळला
कुळवंडी स्मशानभूमीलगत प्रौढाचा मृतदेह आढळला
खेड : तालुक्यातील कुळवंडी गावानजीकच्या डुबी नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीनजीकच्या कातळावर गुरुवारी, दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका प्रौढाचा मृतदेह आढळून आला. या सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून राजेश सखाराम निकम (वय ४०, रा. कुळवंडी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. या घटनेची माहिती कुळवंडीचे पोलिस पाटील अशोक राजाराम निकम यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस कर्मचारी रवींद्र बुरटे करीत आहेत.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा