आस्था सोशल फाउंडेशनमध्ये स्वमग्नता लक्षणांच्या पोस्टरचे रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या हस्ते अनावरण

 



आस्था सोशल फाउंडेशनमध्ये स्वमग्नता लक्षणांच्या पोस्टरचे रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या हस्ते अनावरण



रत्नागिरी:-२ एप्रिल जागतिक स्वमग्नता दिनाच्या निमित्ताने आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेत स्वमग्नता अर्थात ऑटीझम बाबत जाणीवजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुख्यता ऑटीझम काय आहे, ऑटीझमची लक्षणे बघून शक्य तितक्या लवकर ऑटीझमचे निदान होणे व पालकांकडून स्वीकार होणे आवश्यक असल्याने या प्रकारची पोस्टर आस्था तर्फे प्रदर्शीत करण्यात आली. मान्यवरांना ऑटीझम जनजागृती बाबत बॅचेस लावण्यात आले. निळे कपडे परिधान करून ऑटीझमला पाठिंबा दर्शवावा असे आवाहन करण्यात आले. पोस्टरच्या प्रदर्शनानंतर इंदुराणी जाखड यांनी असे सांगितले की, "या मुलांमध्ये निसर्गाने एक तरी विशेष गुण दिलेला असतो तो शोधून आपण त्याला वाव दिल्यास ते खूप पुढे जाऊ शकतील,"त्यांनी असेही जाहीर केले की आम्ही यापुढे जिल्हा परिषदमध्ये कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ न स्वीकारता विशेष गरजा असणाऱ्या मुलांनी बनवलेले कृत्रिम फुलांचे  पुष्पगुच्छ स्वीकारले जातील जेणेकरून या मुलांना मदत होईल. या प्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. नंदिनी घाणेकर, समाज कल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी, समाज कल्याण दिव्यांग सहाय्यता कक्षाचे आंबिवले यांनी आस्थाचे कार्य समजून घेतले व कार्याचे कौतुक केले. आस्थाचे कार्यकर्ते संकेत चाळके, कल्पेश साखरकर,श्रीम. संपदा कांबळे, श्रीम. शिल्पा गोठणकर, श्रीम. मयुरी जाधव, श्रीम.अनुष्का आग्रे, श्रीम.संघमित्रा कांबळे आणि आस्थाच्या सचिव श्रीम. सुरेखा पाथरे व फिजिओ थेरपीस्ट डॉ. श्रुष्टी भार्गव यांनी मान्यवरांना आस्थाच्या कार्याबद्दल माहिती दिली.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या