'समर्थ' कंपनीत झालेल्या स्फोटातील आणखी एका कामगाराचा मृत्यू



'समर्थ' कंपनीत झालेल्या स्फोटातील आणखी एका कामगाराचा मृत्यू


 मृतांची संख्या पाच वर


 आवाशी : लोटे-परशुराम येथील समर्थ इंजिनिअरिंग कंपनीत रविवारी (दि. १८) झालेल्या स्फोटात भाजलेल्या कामगारांपैकी आनंद जानकर यांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्फोटामध्ये दगावलेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील स्फोटात जखमी झालेल्यांवर सांगली येथील सुश्रुत बर्न हॉस्पिटल येथे सुरू होते. मात्र उपचारादरम्यान ओंकार साळवी (खेर्डी-चिपळूण) याचा दोनच दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यातीलच आनंद जानकर (कासई-खेड) याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दि. १८ एप्रिल रोजी झालेल्या स्फोटात सचिन तलवार (बेळगाव), मंगेश जानकर (कासई-खेड), तर विलास कदम (भेलसई-खेड) या तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्यात जखमी झालेल्या सहा कामगारांपैकी चौघांवर सांगली येथे मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. जागीच मृत्यू झालेले मंगेश जानकर व बुधवारी दगावलेले आनंद जानकर हे दोघे सख्खे भाऊ समर्थ कंपनीत गेल्या काही वर्षांपासून काम करीत होते. सांगली येथे अधिक उपचारासाठी दाखल केलेल्या चार कामगारांपैकी आता घाणेखुंट येथील विश्वास शिंदे व तलारीवाडी येथील विलास खरवते हे दोघे उपचार घेत आहेत.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या