धक्कादायक ! आठ वर्षीय मुलीवर अत्याचार, ९ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या
धक्कादायक ! आठ वर्षीय मुलीवर अत्याचार, ९ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या
जयपूर: राजस्थानमधील जयपूर येथे एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी शेजाऱ्याला अटक केली. अत्याचार करणाऱ्या आरोपीला पीडित मुलगी काका म्हणायची. घटनेनंतर पोलिसांनी फरार आरोपीला अवघ्या ९ तासांत अटक केली आहे.जयपूर पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाली. चौकशी केली असता, पीडित मुलीचे कुटुंबीय बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ राहते. याच इमारतीत मजुरीचे काम करणाऱ्याने मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पथक नेमले आणि आरोपीचा शोध सुरू केला.पोलिसांची पथके रात्री करणीविहार आणि श्यामनगर परिसरात आरोपीचा शोध घेत होती. सकाळी लवकरच पोलिसांना एका व्यक्तीबाबत माहिती मिळाली. एक तरूण टॉवेलने तोंड झाकून बस थांब्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला थांबवले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव रणजीत असल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आला. त्याची कसून चौकशी केली असता, बायपासजवळ एका ट्रकच्या दिशेने तो धावू लागला. पळताना तो पडला. त्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा बुंदी येथील हिंडोलीचा रहिवासी आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तो काम करतो. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याबाबत श्यामनगर पोलीस तपास करत आहेत. मुलीला रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment