पतीने केले पत्नीचे ई-मेल अकाऊंट हॅक, गुन्हा दाखल




  पतीने केले पत्नीचे ई-मेल अकाऊंट हॅक, गुन्हा दाखल


 रत्नागिरी : पत्नीचे ई-मेल अकाऊंट हॅक केल्याप्रकरणी पतीविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ मार्च रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास गयाळवाडी येथे घडली. मंथन भरत पटेल (रा. कांदिवली, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पत्नी पूजा मंथन पटेल (३३, रा. गयाळवाडी, रत्नागिरी) यांनी मंगळवारी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, मंथनने त्यांचे ई-मेल अकाऊंट हॅक करून त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केला होता. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत. 




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments