खेडशी येथील बेपत्ता प्रौढाचा आढळला मृतदेह

 



खेडशी येथील बेपत्ता प्रौढाचा आढळला मृतदेह 



रत्नागिरी:- गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या खेडशी येथील प्रौढाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास खेडशी रेल्वे रुळावर आढळला. याची ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद सीताराम गवाणकर (५०, रा.खेडशी चिंचवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत प्रवीण सीताराम गवाणकर यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, गुरुवार १ एप्रिल राेजी सकाळी ५ वाजल्यापासून अरविंद गवाणकर घरात कोणालाही न सांगता निघून गेले होते. या प्रकरणी त्यांनी ग्रामीण पोलिसांकडे बेपत्‍ता असल्याबाबत माहिती दिली होती.शुक्रवारी सकाळी अरविंद यांचा मृतदेह खेडशी रेल्वे रुळाजवळ आढळला. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून उत्‍तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अधिक तपास हेडकाॅन्स्टेबल संतोष कांबळे करत आहेत.




........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org