लोटे एम आय डी सी येथे गोवा बनावट मद्याचा मोठा साठा जप्त
लोटे एम आय डी सी येथे गोवा बनावट मद्याचा मोठा साठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई
रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून 60000/-रु.किमतीचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुददेमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही. वैद्य यांनी अवैध दारू विरोधात मोहीम सुरू केली आहे यावेळी रत्नागिरी जिल्ह्या तील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची विक्री व वाहतूक होवू नये म्हणून अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही.व्ही. वैद्य यांनी विशेष नियोजन केले आहे. दरम्यान खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा केला असल्याची माहीती भरारी पथकाला खब-यामार्फत मिळाली. या नुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी गोवा बनावट गोल्डन एस विस्कीचा 60000/किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. तसेच भरारी पथकाने केलेल्या दुस-या कारवाईत 1300/- किमतीची गावठी दारू जप्त केली. ही कारवाई कुचांबे ता.संगमेश्वर येथे करण्यात आली. ही कारवाई 01/04/2021 रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास करण्यात आली ही कारवाई उपअधिक्षक व्ही.व्ही. वैद्य, भरारी पथकाचे निक्षिक शरद जाधव, जवान निनाद सुर्वे सहकारी महेश पाटील, रोहन तोडकरी यांनी केली. याप्रकरणी विकी अशोक गोरीवले वय 39 वर्षे राहणार ता. चिपळूण जि.रत्नागिरी मनोज पांडूरंग जागुष्टे वय 46 वर्ष रा.कुचांबे ता.संगमेश्वर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचपद्धतीने गोवा बनावट व गावठी दारूधंद्यांवर कारवाया सुरू राहतील, असा इशारा उपअधिक्षक व्ही.व्ही. वैद्य यांनी दिला आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment