ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आवाडे पिता -पुत्रांची भेट

आम्ही तुमच्यापुढे शरणागती स्वीकारलीय असे तरी सुचवायचे नाही ना...!!  निमित्त होतं नाम. ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला तर आवडे यांनी चक्क हात वर केले.



कोल्हापूर : आज रविवार दि. ४ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी सायंकाळी साडेपाच वाजता गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांची  त्यांच्या  इचलकरंजीतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मंत्री श्री. मुश्रीफ व मंत्री श्री. पाटील या दोन्ही नेत्यांनी आवाडे पिता-पुत्रांनी गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा द्यावा, यासाठी विनंती केली.

              यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विलासराव गाताडे, प्रकाश सातपुते, नगरसेवक संजय कांबळे, प्रकाश मोरे, नगरसेवक मदन कारंडे, नगरसेवक प्रकाश पाटील, अमित गाताडे, बाळासो कलागते, शशांक बावचकर, पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील. आदी उपस्थित होते.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

Comments