भाजपाचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून दोन कोटींची विकासकामे
भाजपाचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून दोन कोटींची विकासकामे
रत्नागिरी:-भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून रत्नागिरी जिल्ह्यासाठी 86 लाख रुपये मंजूर झाला आहे. मुंबई जिल्ह्यासाठी एक कोटी 34 लाख 75 हजार रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर झाला आहे. हा निधी लवकरच वितरित होऊन कामाला सुरवात होणार आहे. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार लाड यांनी प्रस्तावित केलेल्या प्रशासकीय मान्यताप्राप्त कामांवरील खर्चासाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षात निधी मंजूर झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील कामांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील कुवारबांव देवधे रस्ता ते श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या कडेची संरक्षक भिंत बांधणे, (ता. रत्नागिरी), मु. पो. पोमेंडी खुर्द ग्रा. पं. मधील पटवर्धनवाडी स्मशानभूमी शेड बांधणे (ता. रत्नागिरी), पोमेंडी खुर्द महालक्ष्मी मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे (ता. रत्नागिरी), मौजे सडामिर्या आनंदनगर बसस्टॉप ते आनंद बौद्धविहार जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, राई गोताडवाडी येथे पिण्याच्या पाण्याची विहीर बांधणे (ता. रत्नागिरी), जाकीमिर्या आनंदनगर कॉलनी येथे टाकी बांधणे आदी कामांचा समावेश आहे. संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी, कातकरवाडी ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण करणे (ता. संगमेश्वर), बोंड्ये मांडवकरवाडी रस्ता करणे (ता. संगमेश्वर), उजगाव बडदवाडी येथे पाखाडी बांधणे (ता. संगमेश्वर), आंबव कोंडकडमराव घाटेवाडी रस्ता डांबरीकरण करणे (ता. संगमेश्वर), पाटगाव रवि भालेकर घर ते सचिन नरे रस्ता डांबरीकरण (ता. संगमेश्वर), विघ्रवली राववाडी डांबरीकरण (ता. संगमेश्वर). पाटगाव गोपाळवाडी ते पाणंद ग्रामपंचायत कार्यालय खडीकरण व डांबरीकरण (ता. संगमेश्वर) या कामांचा समावेश आहे. लांजा तालुक्यातील उपळे विरगाव मेन रोड लांजा रस्ता खडीकरण, डांबरीकरण, कोलधे कुंभारगाव ते घडशीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण (ता. लांजा). एकूण मंजूर निधी 46 लाख 26 हजार या कामांचा समावेश आहे. राजापूर तालुक्यातील निनादेवी मंदिर, चव्हाणवाडी ते कस्तुरघरापर्यंत रस्ता डांबरीकरण, दिवाणी न्यायालय ते भटाळी मुख्य रस्ता डांबरीकरण निधी मंजूर 12 लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment