रेमडेसिवीरचा काळाबाजार; नागरिकांसाठी संपर्क कक्ष ठरला 'हेल्पलेस'
रेमडेसिवीरचा काळाबाजार; नागरिकांसाठी संपर्क कक्ष ठरला 'हेल्पलेस'
पुणे:-रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील संपर्क क्रमांक सलग दुसऱ्या दिवशी कायम व्यस्त राहिले. त्यामुळे नागरिकांसाठी हा कक्ष ‘हेल्पलेस’ ठरला आहे. या नियंत्रण कक्षाला रविवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार नागरिकांनी या कक्षाशी संपर्क साधला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून नियंत्रण कक्षातील संपर्क क्रमांक हे कायम व्यस्त राहिल्याने नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.रेमडिसिव्हर इंजक्शनची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने योग्य पद्धतीने वितरण होण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ०२०-२६१२३३७१ हा दूरध्वनी क्रमांक आणि १०७७ हा टोल फ्री क्रमांक कायम व्यस्त राहिल्याने नागरिक हतबल झाले होते.पुणे शहर आणि जिल्ह्यात रेमडिसिव्हर इंजक्शनची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने योग्य पद्धतीने वितरण होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. ३१ मेपर्यंत हा कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. या नियंत्रण कक्षाशी नागरिकांना संपर्क साधता यावा, यासाठी ०२०-२६१२३३७१ हा दूरध्वनी क्रमांक आणि १०७७ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा हेतू चांगला असला, तरी ही हेल्पलाइन सोमवारी दिवसभर तरी नागरिकांच्यादृष्टीने ‘हेल्पलेस’ ठरली.या कक्षामध्ये तीन पाळ्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नेमणुका करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाच्या वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कागदोपत्री योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी ही व्यवस्थित झाली नसल्याने सोमवारी दिवसभर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment