पिंपळी येथील कॅनॉलमध्ये बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला




 पिंपळी येथील कॅनॉलमध्ये बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला 



रत्नागिरी:-चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे काळकाई मंदिराजवळील कॅनॉलमध्ये गुरूवारी सायंकाळी पिंपळीखुर्द बाजारपेठेतील दोन अल्पवयीन युवक आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडून वाहून गेले होते. बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह रविवारी सापडला आहे. दरम्यान शनिवारी सायंकाळी खेर्डी रेल्वे पुलाखाली वाशिष्ठी नदी पात्रात दिनेश चव्हाण या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. तर बेपत्ता असलेल्या  गौरव पेडणेकर या युवकाचा मृतदेह काल रविवारी  पेठमाप फरशीजवळ वाशिष्ठी नदीपात्रात आढळला.  पिंपळी खुर्द बाजारपेठेतील दिनेश जितेंद्र चव्हाण व गौरव रमण पेडणेकर हे दोघे गुरूवारी सायंकाळी पिंपळी कॅनॉलमध्ये आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडून वाहून गेले हाेते.




........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या