रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद




  रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद



 रत्नागिरी : कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतानाच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. कोरोनामुळे नवीन निर्बंध जाहीर केले असून त्यामुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षेसाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाकडूनही दि. ६ एप्रिलपासून सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील खासगी, शासकीय तसेच विविध माध्यमांच्या एकूण ३२०२ शाळा मंगळवारपासून बंद राहणार आहेत. पुढील शासन आदेश येईपर्यत शाळांमधील अध्यापन बंद ठेवण्यात येणार असून, शिक्षक व कर्मचारी मात्र कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहणार आहेत.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments