श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराकडील मणकर्णिका कुंडाच्या विकास कामातील अतिक्रमणाचा अडथळा अखेर दूर
कोल्हापूर : (प्रतिनिधी)शहर कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराकडील मणकर्णिका कुंडाच्या पश्चिमेकडील माउली लाॅज इमारतीचे अतिक्रमण ते स्वतः श्री. अनिकेत आगळगांवकर काढुण घेणार संयुक्तीक बैठकीमध्ये निर्णय. सदर निर्णयामुळे मणकर्णिकेच्या पुर्णत्वाच्या कामाला चालना मिळाली आहे.
कोल्हापूर येथील श्री करवीर निवासीनी मंदिराचे उत्तरेकडील प्रवेशव्दार घाटी दरवाजा लगत असलेला मणकर्णिका कुंड मुळ स्वरुपात आणणेचे काम अंतिम टप्यामध्ये आहे. कुंडाचे काम पुर्ण करणेच्या दृष्टीने सर्वात मोठा अडथळा असलेली माउली लाॅज इमारतीचे अतिक्रमण व त्यामुळे इमारतीच्या बाजूचा भराव काढणेचे काम अद्यापी झालेली नाही. त्यामुळे कुंडाचे संवर्धन करणेचे कामामध्ये अडथळा आला होता. सदर अडथळा काढणे बाबत शिवसेना कोल्हापूर जिल्हा यांचेमार्फत आंदोलन करणेत आले होते. सदर आंदोलनाच्या दृष्टीने आज रोजी देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर मुख्य कार्यालयामध्ये बैठक आयोजित करणेत आली होती.
मा. महेष जाधव - अध्यक्ष देवस्थान समिती यांचे अध्यक्षतेखाली सदर बैठकीस सुरुवात झाली. सदर बैठकीमध्ये मा. महेष जाव यांनी सदर जागा ही देवस्थान समितीची असुन सदर जागेमध्ये झालेले अतिक्रमण काढुन सदरची जागा देवस्थान समितीकडे ताब्यात देणे बाबत सुचित केले. त्यानुसार सदर कामी श्री संजय पवार यांनी सदर मंदिराच्या चांगल्या कामात कोणताही अडथळा आणु नये, सदरची अतिक्रमण केलेली जागा ही रिकामी करुन देवस्थान समितीचे ताब्यात देणे बाबत माउली लाॅजचे श्री. अनिकेत आगळगांवकर यांना सुचविले. त्यानुसार सदर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होवून सदर श्री अंबाबाई मंदिराच्या जागेमध्ये जे माउली लाॅजचे आॅफिस व पाण्याची टाकीचे अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण विनाअट, विनाशर्त, विना मोबदला पुढील दोन ते तीन दिवसामध्ये काढुन घेवून सदरची जागा मणकर्णिका कुंडासाठी देवस्थान समितीकडे देणेचे श्री अनिकेत आगळगांवकर यांनी मान्य केले. सदरचे आॅफिस व पाण्याची टाकी ही माउली लाॅजचे मालकीच्या जागेमध्ये स्थलांतर करणेचे देखील मान्य केले आहे.
सदर बैठकीमध्ये अंतिमता सदर माउली लाॅजचे आॅफिस व पाण्याचे टाकीचे बांधकाम येत्या दोन ते तीन दिवसामध्ये काढुन घेणेचे माउली लाॅजचे श्री. अनिकेत आगळगांवकर यांनी मान्य केले. सदर निर्णयामुळे मणकर्णिकेच्या पुर्णत्वाच्या कामाला चालना मिळाली आहे. सदर विशय सामोपचाराने मिटविणेत आला त्याबद्दल देवस्थान समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचेवतीने षिवसेना पदाधिकारी व माउली लाॅजचे श्री. अनिकेत आगळगांवकर यांचे तसेच कोल्हापूर महानगरपालिका, पोलीस प्रषासन यांचे आभार मानले.
सदर बैठकीस मा. संजय पवार, मा. विजय देवणे, मा. सुजित चव्हाण, मा. महेष जाधव, मा. सौ. वैषाली क्षीरसागर, मा. शिवाजी जाधव, मा. राजेंद्र जाधव, मा. विजय पोवार, प्र. उप अभियंता नेत्रदिप सरनोबत, मा. रमेष मस्कर, मा. आरती नांद्रेकर, मा. आर. डी. पाटील, माउली लाॅजचे अनिकेत आगळकर हे उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121


Comments
Post a Comment