शिकारीच्या बहाण्याने पतीची हत्या केल्याचा पत्नीचा आरोप; सर्वत्र खळबळ




शिकारीच्या बहाण्याने पतीची हत्या केल्याचा पत्नीचा आरोप; सर्वत्र खळबळ 



रत्नागिरी:- दि.25 जानेवारी 2021 रोजी आरोपी निलेश बबन शेडेकर याने जमिनीच्या वादातून पूर्ववैमनस्याचा बदला घेण्याच्या हेतूने सहआरोपी संजय विठ्ठल पड्यार, अनिकेत अनंत ठुकरुल व इतर आरोपीबरोबर संगनमत करून कट करून  श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांचे पती अनिल शंकर भालवलकर (वय 41 वर्षे) यांची जबरदस्तीने धाऊलवल्ली-पारवाडी जंगलामध्ये शिकारीच्या बहाण्याने नेण्यात आले. त्यानंतर सकाळी दहा वाजता बंदुकीची गोळी घालून निर्घृण हत्या केली. तरी आरोपी आणि त्यांना मदत करणार्‍या व्यक्तींच्या दृष्कृत्याची सखोल तपासणी करून त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रत्नागिरी व पोलिस अधिक्षक रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.आरोपी निलेश बबन शेडेकर, रा.भिकारवाडी कोंडसर, संजय विठ्ठल पड्यार (रा.भिकारवाडी कोंडसर), अनिकेत अनंत ठूकरुल (रा.भिकारवाडी कोंडसर), निवृत्तीनाथ नारायण गोराठे (रा.नवेदर),रुपेश धोंडू रांबाडे (रा.पोवारवाडी कोंडसर बुद्रुक), योगेश बाळकृष्ण रायकर (रा.भिकारवाडी कोंडसर), संदेश सूर्यकांत पोवार (रा.पोवारवाडी कोंडसर बुद्रुक), गणपत दळवी (पारवाडी, धाऊलवल्ली), सिद्धार्थ दत्ताराम तिर्लोटकर (दसुरेवाडी, धाऊलवल्ली), योगेश कमलाकर गुरव (रा.आडीवरे), किरण कांबळी (रा.शेडेकरवाडी), बाबा शेडेकर (शेडेकरवाडी) या सर्व आरोपींनी मिळून संगनमताने माझ्या पतीच्या हत्येचा कट रचून बंदुकीची गोळी घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांनी केला आहे.उमाकांत उर्फ बाळा दाते (रा.नवेदर, ता.राजापूर), संजय दाते (रा. नवेदर, ता.राजापूर), रविंद्र मारुती भोवड (रा.नवेदर, ता.राजापूर), भाई फणसे (रा.नवेदर, ता.राजापूर), प्रशांत पारकर (रा.बेनगी, ता.राजापूर) हे आरोपी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते आरोपींना गुन्ह्यामध्ये मदत करत आहेत व हत्या करणार्‍यांना पाठीशी घालत आहेत.दिलीप काळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक, नाटे पोलिस ठाणे राजापूर यांना या गुन्ह्यासंबंधी पुरेशी माहीती असताना देखील गुन्ह्याचा योग्य तपास न करता आरोपींना कायद्याच्या चौकटीतून आणि योग्य ती कारवाई करण्यापासून वाचविण्याचे कृत्य करीत असल्याचा आरोप श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांनी केला आहे.





........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या