मुबई गोवा महामार्ग वर अपघात




 मुबई गोवा महामार्ग वर अपघात


खेड :-आज दिनांक 03/04/2021रोजी 06.30 वाजताचे दरम्याने महामार्ग पोलीस केंद्र   कशेडी चे हद्दीमध्ये मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वर कळबणी जवळ  कार इको  क्रमांक MH-01-cv-5803वरील चालक राघु गणपत पेडणेकर वय 46 वर्ष राहणार कोळीवाडा वरली मुंबई हे मुंबई ते सावर्डा अशी कार घेऊन जात असताना  कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रोडच्या डाव्या बाजूला असणारे लोखंडी रेलिंग ला जाऊन आदळली त्यामुळे लोखंडी रीलींग तुटून ते कार मध्ये समोरून घुसून कार च्या पाठीमागे निघाले गाडीमध्ये बसलेले प्रवासी योनी बाई कृष्णा सावंत वय८० राहणार मुंबई यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे  प्रफुल्ल राजाराम मोरे वय ४८ राहणार मुंबई यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.रोहित सुरेश वडवरकर वय ३८ राहणार मुंबई यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे .प्रकाश जयराम सावंत वय ६९ राहणार मुंबई यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे .परिचय प्रकाश सावंत वय ३२ राहणार मुंबई यांच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे   त्यांना तात्काळ ॲम्बुलन्स ने कळबणी  रुग्णालय खेड येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अपघात मधील वाहन बाजूला करणाची तजवी ज ठेवणयात आली असून महामार्गावर वाहतूक सुरळीत चालू आहे.अपघाताची माहिती मिळताच  मदत ग्रुप खेड आणि हायवे मृत्यूजय दूत चे प्रसाद गांधी हयांनी 108 ऍम्ब्युलन्स पाठ्वली.





........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org