कोरोना बाधित गरोदर महिला नातेवाईकांसह कोव्हीड सेंटरमधून थेट जिल्हा रुग्णालयात




 कोरोना बाधित गरोदर महिला नातेवाईकांसह कोव्हीड सेंटरमधून थेट जिल्हा रुग्णालयात 



रत्नागिरी:-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत असताना पॉझिटिव्ह रुग्ण आणि नातेवाईक यांचा मनस्ताप देखील आरोग्य यंत्रणेला सहन करावा लागत आहे. गुहागर तालुक्यातील कोरोना बाधित महिलेला उपचारासाठी महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ही महिला शुक्रवारी रात्री नातेवाईकांसोबत कोव्हीड सेंटर असलेल्या महिला रुग्णालयातुन पळून गेली. महिला रुग्णालयातून या महिलेने थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठले. पॉझिटिव्ह महिला थेट सिव्हिल मध्ये आल्याने आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ उडाली. सिव्हिल मध्ये या महिलेची रात्री प्रसूती झाली. यानंतर शनिवारी सकाळी महिलेला आणि नवजात बालकाला पुन्हा महिला रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर विश्वास दाखवावा आणि उपचारासाठी पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. एका चुकीमुळे अनेकजणांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org