काश्मीर : दोन चकमकींत चार दहशतवादी ठार




 काश्मीर : दोन चकमकींत चार दहशतवादी ठार


शोपियाँ येथे ठार झालेल्यांपैकी एक अल्पवयीन तरुण अलीकडेच दहशतवादी गटात सामील झाला होता.



श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील अनंतनाग येथे रविवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींत लष्कर-ए-तैयबा आणि अल-बद्र या संघटनांचे चार दहशतवादी ठार झाले. यापैकी काही जण अनंतनाग येथे प्रादेशिक सेनेच्या एका सैनिकाच्या शुक्रवारी झालेल्या हत्येत सहभागी होते.यामुळे, शनिवारी अनंतनाग व शोपियाँ येथे सुरू झालेल्या चकमकींत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाचवर गेली आहे. एक दहशतवादी सुरुवातीला झालेल्या गोळीबारात मारला गेला होता.बिजबेहराचे रहिवासी आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेले तौसिफ अहमद भट आणि आमिर हुसेन गनी यांनी शरण येण्यास नकार दिला आणि एका शोधपथकावर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहरा भागातील सेमठान खेड्यात सुरक्षा दलांनी त्यांना ठार मारले.प्रादेशिक सेनेचा सुट्टीवर असलेला सैनिक मोहम्मद सलीम अखून याच्या गोरिवान बिजबेहरा येथील घरानजीक शुक्रवारी झालेल्या हत्या प्रकरणासह अनेक दहशतवादी गुन्ह्यांत हे दोघेही हवे होते. सीआरपीएफच्या एका पथकावरील हल्ल्यातही पोलीस त्यांच्या शोधात होते.शोपियाँ येथे ठार झालेल्यांपैकी एक अल्पवयीन तरुण अलीकडेच दहशतवादी गटात सामील झाला होता. सुरक्षा दलांनी शरण येण्यासाठी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर दहशतवाद्यांनी त्याला तसे करू दिले नाही. येथील चकमकीत ठार झालेल्यांची नावे आसिफ अहमद गनाई व फैझल गुलझार गनाई अशी असून ते चित्रगाम कलाँचे रहिवासी होते. ठार झालेल्या तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली नाही.





.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



 

Comments