हृदयद्रावक! करोनामुळे पतीचा मृत्यू, पत्नीने चिमुकल्यासह तलावात उडी मारून केली आत्महत्या




 हृदयद्रावक! करोनामुळे पतीचा मृत्यू, पत्नीने चिमुकल्यासह तलावात उडी मारून केली आत्महत्या



नांदेड: करोना संकटकाळात नांदेड जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. करोना संसर्गाने पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच, पत्नीनेही अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात ही हृदयद्रावक घटना घडली. मूळचे आंध्र प्रदेशातील शंकर गंदम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायानिमित्त लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात पत्नी आणि दोन मुली, एका मुलासह राहत होते. शंकर हे अँटिजेन चाचणीसाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला.शंकर यांच्या मृत्यूची माहिती पत्नी पद्मा गंदम यांना समजली. त्यांना तो धक्का सहन झाला नाही. त्यांनी तीन वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन लोहा परिसरातील तलावात उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. गंदम दाम्पत्याच्या मृत्यूनंतर मात्र, त्यांच्या दोन चिमुकल्या मुली अनाथ झाल्या आहेत. या घटनेने लोहा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments