कोल्हापूरात रंगपंचमी संमिश्र स्वरूपात साजरी


                                                                 छाया - तय्यब अली

कोल्हापूर : (प्रतिनिधी) रंगपंचमी निमित्त नेहमी होणाऱ्या रंगाच्या उधळणीस, कोरोना नियमाचा फटका बसल्यामुळे   काही ठिकाणी उत्साहावर  विरजण पडले. यामध्ये ताराबाई  पार्क, नागाळा पार्क,  रुईकर कॉलनी, आदी  भागात शुकशुकाट जाणवत होता. पण शहरातील पेठांच्या भागात मात्र जोरदार रंगपंचमी  आबालवृद्ध महिला पुरुष, व तरुणांनी  साजरी केली. यावेळी  सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता.  दुपारनंतर नागरिकांनी नदी, विहिरी, तलावाच्या ठिकाणी  आंघोळीसाठी गर्दी केली होती. 



रंगपंचमी दिवशीच शहरातील काही भागात पाणी आले नाही. तर काही भागात कमी दाबाने आले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.  शाहूपुरी कुंभार गल्ली येथे महापालिकेने तातडीने टॅंकरने पाणी पुरवठा केला. व तेथील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिला त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.  




...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

टिप्पण्या

news.mangocity.org