'त्या' राज्यांत करोना का वाढत नाही?; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स करणार अभ्यास




 'त्या' राज्यांत करोना का वाढत नाही?; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स करणार अभ्यास

 

मुंबई:-देशात फक्त महाराष्ट्रातच एवढ्या झपाट्याने करोना वाढत असताना, निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मात्र करोना वाढताना दिसत नाही. त्यामुळे यासंदर्भात आम्ही टास्क फोर्सला अभ्यास करायला सांगतल्याची माहिती महाविकास आघाडीतील मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी दिली.राज्यात वाढत्या करोना संसर्गामुळे परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अशावेळी करोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येवर अस्लम शेख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सला याबाबत माहिती घेण्यास सांगितले असल्याची माहिती शेख यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आम्ही यासंदर्भात टास्क फोर्सला अभ्यास करायला सांगितले आहे. महाराष्ट्रातच का करोना संसर्ग वाढत आहे?ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तेथे का नाही? निवडणुका असलेल्या राज्यांत हजारोंच्या संख्येने प्रचार सभा होत आहेत. तरी देखील तिथे करोना संसर्ग कसा वाढत नाही, असा सवालही शेख यांनी केला.दरम्यान, राज्यात रविवारी ६३ हजारांहून अधिक करोनारुग्णांची नोंद झाली. त्यामुळे दररोज ५० हजारांहून अधिक वाढत जाणाऱ्या करोना रुग्णांमुळे राज्यात लॉकडाउन लावण्याची स्थिती आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. करोनाची साखळी तोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावणे गरजेचे असल्याचे मत टास्क फोर्सने व्यक्त केले आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments