हळहळ! सेल्फीच्या नादात तिघे मित्र यमुना नदीत बुडाले




हळहळ! सेल्फीच्या नादात तिघे मित्र यमुना नदीत बुडाले



आग्रा: उत्तर प्रदेशातील कौशलपूरचे तीन तरुणांचा यमुना नदीत बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी उतरलेल्या या तरुणांनी सेल्फीच्या नादात आपला जीव गमावला. एका तरुणाचा मृतदेह सोमवारी सापडला. उर्वरित तरुणांचा शोध सुरू आहे. एत्माद्दौला परिसरातील जवाहर पुलाजवळ सहा तरूण रविवारी यमुना नदीकाठावर मौजमजेसाठी गेले होते, अशी माहिती मिळते.गौरव (वय १९), प्रेम शरण (वय १८), सुमित उर्फ कालू (वय १८) असे या तिघा मित्रांचे नाव आहे. हे तिघेही एकाच परिसरात राहत होते. यमुना नदीत ते पोहोचण्यासाठी उतरले होते. तिघांनी सेल्फी काढली. ते फोटो त्यांनी आपल्या इतर मित्रांना पाठवले. तसेच सोशल मीडियावरही पोस्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार, नदीत पोहोण्यासाठी उतरल्यानंतर तिघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. तिघेही बुडू लागले. काठावर असलेल्या इतर मित्रांनी या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तिघेही बुडाले होते.इतर मित्रांनी दुर्घटनेबद्दल प्रेम शरण, सुमित आणि गौरवच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर तिघांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तिघांचा शोध घेतला. मात्र, रात्र झाली तरी सापडले नाहीत. सोमवारी सकाळी पुन्हा पोलीस आणि स्थानिकांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी सांगितले की, सुमित उर्फ कालूचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. 




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments