संशयातून पतीने पत्नीवर केला कोयतीने हल्ला


 


संशयातून पतीने पत्नीवर केला कोयतीने हल्ला


 देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे खालचीवाडी येथे पतीने पत्नीवर संशय घेत कोयतीने वार केल्याने पत्नी जखमी झाली आहे. पतीवर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपाली संतोष वेलोंडे (३०, रा. पेढांबे खालचीवाडी) हिने संगमेश्वर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पती संतोष पांडुरंग वेलोंडे हा दररोज दारू पिऊन रुपाली वेलोंडे हिच्यावर संशय घेतो. सोमवार २६ रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला होता. रुपाली वेलोंडे ही झोपण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याला राग येऊन रात्री हातात कोयतीने रुपालीवर वार केले. यामध्ये तिच्या उजव्या बाजूस कानाच्या जवळ कोयतीने मारून दुखापत केली. तसे शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली आहे. रुपाली हिने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष वेलोंडे याच्यावर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112





Comments